महत्वाच्या बातम्या

 रसायनशास्त्र विषयात प्रा. वर्षा शेवटे यांना पीएचडी पदवी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका वर्षा शेवटे यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे रसायनशास्त्र विषयात पीएचडी (आचार्य) पदवी प्रदान करण्यात आली आहे. Adsorption of Heavy Metals from Aqueous Solution Using Pre-Treated Adsorbent  या विषयावरील त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत ही पदवी बहाल करण्यात आली.

प्रा. वर्षा शेवटे यांनी हे संशोधन डॉ. सुधीर हुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या संशोधनामध्ये पाण्यातील जड धातूंचे शोषण करण्यासाठी पूर्वप्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या Adsorbent च्या कार्यक्षमतेचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षण व जलशुद्धीकरणाच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

प्रा. वर्षा शेवटे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे संचालक स्वप्नील दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगिनवार, अनुप एकरे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी अभिनंदन केले. याशिवाय महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक वाटचालीसाठी यशस्वी भवितव्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos