जिल्हाधिकाऱ्यांची बल्लारपूर येथील विशेष मतदार पुनरीक्षण शिबिराला भेट : BLO कार्याचा घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत बल्लारपूर येथील कॉलरी काटा-गेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला शनिवारी २५ जुलै रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरात कार्यरत असलेल्या BLO (केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्या गणना पत्रकांची तसेच BLO App मधील नोंदींची तपासणी केली. गणना पत्रक भरताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करत मतदार नोंदणीचे काम अधिक अचूक व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, गट शिक्षण अधिकारी सचिन मालवी, पर्यवेक्षक श्रीनिवास रायला व राजेंद्र गुडध्ये उपस्थित होते.
शिबिरात विनय दत्ता, श्रावंती इसंपल्लीवार, संजय बोज्जा, सूरज वाघमारे, संतोष काकडे, शुभम काटेवार, तुलसीदास राठोड, गोमती वर्मा, नूतन पेंदे, सुनीता घुबडे, सन्नी महेश्वरी, नंदा उपासे यांच्यासह अनेक केंद्रस्तरीय अधिकारी व शंकर रामटेके, अभय वडस्कर, उमेश पोडे, दीपक प्रसाद या BLO सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खरतड तसेच नगर परिषद सदस्य अविनाश मठ्ठा यांनी सहकार्य केले.जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला अधिक गती मिळणार असून, मतदार नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




