नीट पेपर लीक प्रकरणावर संताप : चंद्रपुरात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम, लाठीचार्जचा निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नीट (NEET) पेपर लीक प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात युवासेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. जनता कॉलेज चौकात आयोजित या मोहिमेत विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत, देशातील शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी केंद्र सरकारने या प्रकरणात कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही केली.
यावेळी सहारे म्हणाले की, नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी युवासेना सातत्याने आवाज उठवत राहील आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या स्वाक्षरी मोहिमेत युवती जिल्हाप्रमुख रोहिणी वैरागडे, फैजल खान, मोहित टोंगे, आदित्य कन्नमवार, आदम घोंगडे, नैतिक शर्मा, श्रेयस हेडाऊ, विक्की गवाडे, अमोल दिखाडे, सोनल सोनाळकर, धम्मदीप खोब्रागडे, निखिल मोहरले
News - Chandrapur




Petrol Price




