महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थी मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भांडार : भंडारा जिल्हा वकील संघाने दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. या निवेदनात विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अण्ड नितीन रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली अनेक वकील या शिष्टमंडळात सहभागी झाले.

दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा जिल्हा कौन्सिल यांच्या वतीने मोहाडी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात नीट आणि महाराष्ट्रातील टेट परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच दोषींवर कठोर कारवाई, एनटीएची जबाबदारी निश्चित करणे, शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारणे आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.





  Print






News - Bhandara




Related Photos