महत्वाच्या बातम्या

 सेंदुरवाफा/ साकोली येथे २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :  महसुल व वन विभागाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयान्वये शासनाने महसुल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याकरीता तसेच शासन निर्णयाचा लाभ तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री महोदयांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राज्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय समाधान शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये मंगलमुर्ती सभागृह, सेंदुरवाफा / साकोली जि. भंडारा येथे २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले असून सदर शिबीरात सर्व विभागाचे अधिकार /कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

सदर शिबिरात उपस्थित राहुन भोगवटदार वर्ग २ चे वर्ग -१ मध्ये रुपांतरण, जिवंत ७/१२ टप्पा -१ जिवंत ७/१२ टप्पा -२ सामाजिक अर्थसहाय्य योजना, तुकडेबंदी कायदयाविरुध्द व्यवहार नियमानुकूल करणे, दाखले / प्रमाणपत्र वितरण, सर्वांसाठी घरे / पट्टे वाटप, प्रलंबित फेरफार, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा व ८ अ वितरण, अधिकार अभिलेख दुरुस्ती, दाखले प्रमाणपत्र करिता अर्ज स्वीकारणे, ई-मोजणी अर्ज स्वीकारणे, तसेच मोजणी नकाशा क प्रत वितरण, पाणंद रस्ते प्रशासकिय मान्यता आदेश वितरण, ॲग्रीस्टॅक व पी.एम किसान नोंदणी, अकृषक आदेश निर्गमित प्रकरणात कजाप तयार करुन गाव दप्तर अद्यावत करणे, भूसंपादन प्रकरणात कजाप तयार करुन गाव दप्तर अद्यावत करणे, फेरफार अदालत, शर्तभंग नियमानुकूल प्रकरणे, आदिवासी खातेदार विक्रीपरवानगी प्रकरणे, अग्रीस्टॅक नोंदणी, वन पट्टेधारकर फॉरमर आयडी. 

वन पट्टेधारकर E-KYC विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना विविध प्रमाणपत्र / आधार कार्ड वितरण, राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असुन त्यानुसार प्रमाणपत्र वाटप करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्य देण्याची सनद वाटप करणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमीत करणे तसेच अन्य विभागाच्या योजना उदा. पुरवठा, भुमी अभिलेख, कृषी, एस.टी., आरोग्य, पशुवैद्यकीय इत्यादी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी साकोली स्वाती देसाई यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos