विद्यार्थ्यांचा अन्याय कदापि खपवून घेणार नाही; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील


- जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे
विदर्भ न्यूज एक्सरेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराचा निषेध तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी गडचिरोली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने उत्तर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही. न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर लाठीमार करणे ही लोकशाहीविरोधी बाब असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पोलिसांच्या दबावाला काँग्रेस पक्ष कधीही घाबरणार नाही किंवा मागे हटणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करत राहील.
आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कारवाईनंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा लढा कायम राहील, असा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशा प्रमुख मागण्या केल्या.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेगा वरगंटीवार, ज्येष्ठ नेते समशेर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, राष्ट्रीय समन्वयक कुसुम अलाम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पंचायतराज सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश डोंगरे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत धाईत, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, प्रदेश महिला काँग्रेसच्या पुष्पलता कुंमरे, धानोरा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शेवंता हलामी, माधुरी मडावी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजेवाणी, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांच्यासह हेमंत कोवासे, श्रीनिवास आंबटकर, दिगंबर घाईत, विजय सुपारे, शालिक पत्रे, नीलकंठ गोहने, दिगंबर बुल्ले, नंदू वाईलकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रीना गोवर्धन, चारुदत्त पोहणे, संजु चन्ने, दिनेश सिडाम, आशिष घेर, राज घेर, गुड्डू हुलके, अनुराग निखाडे, सोनू आलन, निकेश कामीडवर, प्रज्वल कोंडेकर, तेजस कोंडेकर, जावेद खान, मिलिंद बारासगडे, सुधीर बांबोळे, ओमप्रकाश चौधरी आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




