बल्लारपूर पोलीस ठाण्यात दोन पोलीस उपनिरीक्षकांना भावपूर्ण निरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम यांच्या बदलीनिमित्त पोलीस ठाण्यात भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करत सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे यांची ब्रम्हपुरी येथे, तर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम यांची गडचिरोली परिक्षेत्रात बदली झाली आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही अधिकाऱ्यांनी बल्लारपूर येथील सेवाकाळातील अनुभवांना उजाळा देत सहकाऱ्यांचे सहकार्य आणि नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व उत्कृष्ट सेवाभावाचे कौतुक करून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निरोप समारंभाला पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात दोन्ही अधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
News - Chandrapur




Petrol Price




