अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाद्वारे शिष्यवृत्ती योजना : २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय भंडारा यांच्या वतीने अनुसूचित जातीतील मांग/मातंग तसेच या समाजातील बारा पोटजातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदविका अथवा पदवी परीक्षेत किमान ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, टी.सी., गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तसेच दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. इच्छुकांनी २७ जुलै २०२६ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथील जिल्हा कार्यालयात संपर्क साधून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Bhandara




Petrol Price




