महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात १५ ते २९ जुलैपर्यंत कलम ३७ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन, देवशयनी आषाढी एकादशी, शिर्डी येथील साईबाबा उत्सव आणि गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ००.०१ वाजेपासून ते २९ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (२) (३) अंतर्गत आदेश लागू करण्यात आला आहे.

अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लीना फलके यांनी हा आदेश जारी केला असून, या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, घोषणाबाजी व मिरवणुकांवर निर्बंध राहतील.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.  





  Print






News - Bhandara




Related Photos