जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांचा छापा : चौघांविरुद्ध गुन्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वार्ड परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धाड टाकत चौघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, तीन मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी मुखबिरामार्फत विद्यानगर वार्डातील शंकर तुळशीराम वनकर यांच्या घराच्या अंगणात काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीसांनी घटनास्थळी धाड टाकली. तेथे चार जण गोलाकार बसून पत्त्यांच्या सहाय्याने हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ घेराव घालून चौघांनाही ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींची नावे मिलिंद सज्जन गेडाम ५४, प्रविण प्रभाकर जावळे ४६, विनोद रमेश दुधे ४६, तिन्ही रा. कन्नमवार वार्ड, बल्लारपूर तसेच शंकर तुळशीराम बनकर ५६, रा. विद्यानगर वार्ड, बल्लारपूर अशी निष्पन्न झाली. पोलिसांनी आरोपी कडून २१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




