वैनगंगा विद्यालय, चुरमुरा येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वैनगंगा विद्यालय, चुरमुरा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना लोकशाही पद्धतीने अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, संघटन कौशल्य तसेच लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळाची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार शेंडे यांनी नवनिर्वाचित मंत्रीमंडळाला त्यांच्या पदाचे महत्त्व, अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांची सविस्तर माहिती देत प्रामाणिकपणे व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यंदाच्या शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून विकास शिवणकर, उपमुख्यमंत्री म्हणून धनश्री लोहर, शिक्षणमंत्री म्हणून प्रज्वल मस्के, क्रीडामंत्री म्हणून यश सातपुते, सांस्कृतिक मंत्री म्हणून तनुजा बुरकुटे, आरोग्यमंत्री म्हणून नंदिनी रोहनकर, पर्यावरण मंत्री म्हणून मेघा इटणकर, स्वच्छता मंत्री म्हणून गणेश मेश्राम यांची निवड करण्यात आली. तसेच मुलींची प्रतिनिधी म्हणून प्रिया बांबोळे हिची निवड करण्यात आली.
संपूर्ण निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून राऊत सर आणि मस्के मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गेडाम सर, बरडे सर, राऊत मॅडम, नागरे सर, मोरांडे सर, मडावी सर, चौधरी सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांची रुजवण होण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




