महत्वाच्या बातम्या

 बि.सि.सि.आय. राष्ट्रीय स्पर्धेत प्रदर्शन केल्याबद्दल खासदार रामदास तडस यांनी क्रिकेटपटु राजसिंग चैहाण याचे केले अभिनंदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : १९ वर्षा खालील युवा क्रिकेटपटु राजसिंग चैहाण याने ऑक्टोंबर महिन्यात संपलेल्या बि.सि.सि.आय. च्या एकदिवसीय विनू मंकड ट्राफी स्पर्धेत विदर्भसंघाचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या डावखोरा महलदगती गोलंदाजीने ११ खेळाडूंना बाद करून विदर्भाला अजिंक्य बनवण्याकरिता महत्वाची भूमीका निभवली, तसेच बि.सि.सि.आय. च्या चार दिवसीय कुचबिहारी ट्राफी स्पर्धेत ३१ खेळाडूंना बाद करून विदर्भाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून दिले आहे. 

वर्धा येेथील खासदार रामदास तडस जनंसपर्क कार्यालयात वर्धेचा क्रिकेटपटु राजसिंग चैहाण याचा खासदार रामदास तडस यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, प्रणव जोशी उपस्थित होते.

वर्धा शहरातील उत्कृष्ट क्रिकेटपटू ठरला असून क्रिकेटपटु राजसिंग चौहाण आपल्या वर्धा जिल्हाचे नाव संपुर्ण देशात गौरनवित केले असून पुढेही खेळत राहुन आंतराष्ट्रीय स्तरावर आपले नाव मोठ करावे, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos