महत्वाच्या बातम्या

 दुर्गापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार : आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५२ वर्षीय व्यक्तीने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना १० जुलै रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रवि फाले ५२ वर्षे रा. कोंडी ऊर्जानगर असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या नातेवाईक आहे. विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी धाडसाने पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

मुलीचे पोट दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात उपचार करीता नेले असता डॉक्टरांनी तपासले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आले. ती मुलगी दोन महिन्याची गरोदर होती. लागलीच डॉक्टरांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन ला कळविले.

या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७९/२६ कलम ६४,६५, पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलीसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos