महत्वाच्या बातम्या

 एलसीबीच्या जाळ्यात सराईत आरोपी दारासिंग : गडचांदूर येथील लाखोंच्या चोरीचा उलगडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत गडचांदूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले आहे. चोरीप्रकरणी संशयित आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे ११ जुलै रोजी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचांदूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २९३/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी दारासिंग हिरा बदखल (वय ३५), रा. यात्रा वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस ठाण्यात दुसऱ्या एका गुन्ह्यात जप्त असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

या चोरीप्रकरणात एकूण १ लाख ७९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दिपक काँक्रेडवार, बलराम झाडोकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोहवा किशोर वैरागडे, पोअं गोपीनाथ नरोटे, चंद्रशेखर माथनकर यांनी केले असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos