जादुटोना विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन बाबत समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : जादुटोना विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावरील प्रबोधनकार श्रीकृष्णा शालीकराम धोटे श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगर अमरावती यांचे समाजप्रबोधनपर कार्यक्रम नुकतेच नगर परिषद सांस्कृतीक सभागृह देसाईगंज पार पडले.
या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी सतिश चौधरी, उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, सभापती पाणीपूरवठा व जलनिसारण समिती, सचिन खरकाटे, सभापती शिक्षण समिती, बाळकृष्ण माडुरवार, सभापती नियोजन समिती पिंकू बावणे, नगरसेवीका राधीका पत्रे, मंदा समर्थ, पल्लवी मेंढे, पार्वता बेदरे, आशा दहिवले नगरसेवीका, भारती कुथे नगरसेवीका ईत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रबोधनकार श्रीकृष्णा शालीकराम धोटे यांनी जादुटोना विरोधी कायद्यातील प्रमुख तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन व समाजामध्ये असणारे भोंदू बाबा सर्वसामन्य जनतेस कशाप्रकारे फसवितात यांची माहिती विविध वैज्ञानिक प्रयोगाचे माध्यमातून समजावून सांगीतले तसेच यापासुन सर्वसामान्य माणसाला कशाप्रकारे दुर ठेवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे तर आभार प्रदर्शन वरिष्ट लिपीक दिनकर खेत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता लेखापाल अविनाश राठोड, कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार, स्वप्नील हमाने, अभियंता सौरभ नंदनवार, प्रशांत चिचघरे, योगिता निंबार्ते, लिपीक रितेश येरणे, मुकेश सोनेकर, अनिता राजगूरु, नाजीमा पठाण, शहर समन्वयक प्रफुल दुपारे, समुदाय संघटक अरुण मोटघरे, जवाहर सोनेकर, व्यंकट चौधरी, घनश्याम कांबळे, सत्यवान कोडाप, रविंद्र सेंद्रे, राजू निंबेकर व ईतर नगर परिषद कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli




Petrol Price




