महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू


- अड्याळ-लाखनी मार्गावर सालेवाडा गावाजवळ अपघात; फिरायला गेलेल्या राकेश काटेखाये यांचा दुर्दैवी अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अड्याळ-लाखनी मार्गावर घडली. या अपघातामुळे चिचाळ परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुण व्यापाऱ्याचे नाव राकेश रामू काटेखाये रा. चिचाळ असे आहे. ही घटना अड्याळ-लाखनी मार्गावरील सालेवाडा गावाजवळ सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, राकेश काटेखाये हे सायंकाळच्या वेळेस अड्याळ-लाखनी मार्गावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनाच्या धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि राकेश यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान, तरुण व्यापारी राकेश काटेखाये यांच्या अकाली निधनामुळे चिचाळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos