संघटन विस्तारावर भाजपचा भर : बल्लारपूरमध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराने संघटना विस्तार आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढविण्यासाठी सर्व आघाड्यांच्या अध्यक्ष व सरचिटणीसांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन करत बूथस्तरापर्यंत पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणन्जय सिंह होते. त्यांनी पक्षाच्या विविध आघाड्यांनी समन्वयाने काम करत आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी ७ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत सर्व आघाड्यांच्या स्वतंत्र संघटनात्मक बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक आघाडीने आपल्या अध्यक्ष व महासचिवच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन संघटन विस्तार, नवीन कार्यकर्त्यांचा सहभाग आणि आगामी उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीस शहर महासचिव मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर, सतीश कनकम, नगर परिषद बल्लारपूर येथील भाजपचे गटनेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी सर्व आघाड्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
News - Chandrapur




Petrol Price




