महत्वाच्या बातम्या

 व्हिजन ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षरोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या व्हिजन ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत आलोडी येथील राखीव वन सर्वे क्रमांक ७१ मध्ये जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

वर्धा प्रादेशिक वनविभागाच्यावतीने आयोजित वृक्षारोपन कार्यक्रमास पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, विभागीय वन अधिकारी सुहास बढेकर, सहाय्यक वनसंरक्षक तेंदू व वन्यजीव हरिलाल सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे तसेच साटोडा गावचे सरपंच गौरव गावंडे व इतर सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नागरिकांनी व्हिजन ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.

या वृक्षारोपण मोहिमेमध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात हातभार लावला.

तसेच साटोडा आणि आलोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने वृक्षलागवड करून आपला सहभाग नोंदवला. या प्रसंगी उपवनसंरक्षक कार्यालय वर्धा सामाजिक वनीकरण विभाग आणि वर्धा व हिंगणी वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बहुसंख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos