आंजी येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा शुभारंभ ग्रामीण विकासाला चालना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत VB-G-RAM G योजनेचा शुभारंभ आज वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी. पराग सोमण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीपती मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे, गट विकास अधिकारी (नरेगा) शीतल हिवराळे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, ग्रामपंचायतीचे प्रशासक जगदिश संचारिया, पदाधिकारी तसेच ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी योजनेची सविस्तर माहिती देऊन लाभार्थी, ग्रामस्थ, बचत गट आणि स्वयं सहाय्यता गटांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या योजनेअंतर्गत जलसंधारण, जलसंवर्धन, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका संवर्धन तसेच हवामान बदलाशी संबंधित विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचे पराग सोमन यांनी सांगितले.
विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत उपजीविका हमी, अधिनियमा अंतर्गत हाती घेण्यात येणारी कामे, कामांचे नियोजन, शेतीच्या पिक हंगामात पुरेसा शेतमजुर उपलब्ध राहील याची खात्री, योजनेचे स्वरुप, निधीवाटप पद्धत, वस्तुनिष्ठ निकषाच्या आधारे निधी वाटप, विशेष सवलती, अंमलबजावणी संरचना, पंचायत राज संस्थांची भुमिका, मजुरी दर, मजुरी हमी, बेरोजगारी भत्ता हमी, पारदर्शकता व जबाबदारी तसेच VB-G-RAM G अंतर्गत जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करणे तसेच जुने अपूर्ण असलेली कामे बंद न होता चालु राहतील व पूर्ण केले जातील असे श्रीपती मोरे यांनी सांगितले
नवीन अधिनियमांतर्गत रोजगार हमी १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली असून १ जुलै २०२५ पासून मजुरी दर ३१७ रुपये करण्यात आला आहे.
तसेच बेरोजगारी भत्ता, वेतन वितरण आणि ग्रामसभेच्या माध्यमातून कामांचे नियोजन याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ज्ञानदा फणसे मार्गदर्शन केले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मुस्लिम कब्रस्तान परिसरात तसेच नरसाई माता मंदिरातील ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी यांनी मानले.
News - Wardha




Petrol Price




