देवरी येथील वृद्धाची विषप्राशन करून आत्महत्या : गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / देवरी : देवरी तालुक्यातील पुराडा येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. धनराज मंगरू नंदेश्वर ( ६५, रा. पुराडा, ता. देवरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी सोमवारी (२२) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनराज नंदेश्वर यांनी शुक्रवारी (१९) आपल्या राहत्या घरी विषारी पदार्थाचे सेवन केले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती अत्यंत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील गंभीर उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा केटीएस रुग्णालयात रेफर केले.
तेथील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे ५:२२ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




