महत्वाच्या बातम्या

 स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन विशेष


स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते.व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. वडील व्यवसायाने वकील होते. तर आई धार्मिक व्रुत्ती ची होती.

 स्वामी विवेकानंद यांच्यावर आईवडिलांनी लहानपणापासूनच ऊत्तम संस्कार केले. स्वामी विवेकानंद हे एक हिंदु विचारवंत होते. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवादिन म्हणुन साजरा केला जातो. त्यांचे खरे नाव नरेंद्र होते.

स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच अलौकिक प्रतीभावान बुद्धिचे होते.त्यांनी तत्वज्ञान, धर्म ,ईतिहास, सामाजिक ,विज्ञान, कला व साहित्य ईत्यादि विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर त्यांनी वेद,ऊपनीषद,पुराण, रामायण, महाभारत अशा हिंदु धर्मग्रंथांचा पुरेपुर  अभ्यास केला. स्वामी विवेकानंद हे केवळ वेदांतात व अभ्यासातच हुशार नव्हते तर ते खेळ व शाररीक व्यायामातही कुशल होते. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा. 

त्यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महान गुरूंचे आगमन झाले.रामकृष्णांनी त्यांना दिक्षा दिली .व त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद केले. रामकृष्णानी त्यांना कालीमातेचा साक्षात्कार घडवुन दिला. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले.त्यांनी भारतात व पाश्चिमात्य देशात भाषणे दिली.व हिंदु धर्माचा प्रसार केला.

जगात त्यांनी ठिकठिकाणी रामकृष्ण मीशन व रामकृष्ण मठाची स्थापना केली.व हिंदु धर्माच्या तत्वज्ञानाची ओळख जगाला करून देणे हे या मिशनचे प्रमुख कार्य होते.या मीशनने अनेक ठिकाणी रूग्णालये,अनाथाश्रम व वसतिगृह ऊभारून समाजसेवेचे अनमोल कार्य हाती घेतले.

इ.स.१८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधु भगीनींनो असे ऊदगार काढताच टाळ्यांचा दोन मिनिटे कडकडाट झाला. या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान असुन ते एकाच ऊद्दीष्टासाठी आहे.सर्व धर्मांना अधर्म व अत्याचाराशी लढायचे आहे हे पटवून दिले.

आयुष्यात फक्त धर्म व समाजसेवा स्विकारून विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद हे एक अलौकिक महापुरुष होते. त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहे.

अशा या महान संताने ४ जुलै १९०२ रोजी कलकत्यातील बेलुर मठात समाधी घेतली. त्यांना माझा शतशः प्रणाम 

सौ. भारती कोंतमवार

मुल






  Print






News - Editorial




Related Photos