महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही सर्वोदय महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही सर्वोदय महाविद्यालय,  येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रिजवान शेख व प्रा. अमित उके (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले.

या कार्यक्रमात विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना योगाचे महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे समजून घेण्यास मदत झाली.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. तुकाराम बोरकर, प्रा. अशोक भोसले, प्रा. अपर्णा कोवे, प्रा. प्रफुल रणदीवे, श्रीमती तरूताई मून तसेच कालिदास गेडाम उपस्थित होते.कार्यक्रमात सर्वांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला.





  Print






News - Chandrapur




Related Photos