आजचे दिनविशेष


२० जून महत्वाच्या घटना
१८३७ : इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
१८४० : सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
१८६३ : वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.
१८८७ : देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८९९ : केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
१९६० : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
१९९० : ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
१९९७ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
२००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
२००३ : विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना.
१९६० : माली या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४४ : दुसरे महायुद्ध - फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४ : MW 18014 V-2 रॉकेट - १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३ : दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४० : दुसरे महायुद्ध - मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१ : चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना.
२० जून जन्म
१८६९ : किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
१९१५ : चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)
१९२० : लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)
१९३९ : जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९४६ : पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.
१९४८ : नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.
१९५२ : भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.
१९५४ : इंग्लिश क्रिकेटपटू अॅलन लॅम्ब यांचा जन्म.
१९७२ : क्रिकेटपटू पारस म्हांब्रे यांचा जन्म.
१९५८ : भारताच्या १५व्या राष्टपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म
१९४३ : भारतीय कादंबरीकार सुबिमल मिश्रा यांचा जन्म (मृत्यू : ८ फेब्रुवारी २०२३)
१८६१ : इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स यांचा जन्म (मृत्यू : १६ मे १९४७)
२० जून मृत्यू
१६६८ : जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०)
१८३७ : इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९१७ : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.
१९८७ : पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.
१९९७ : मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.
१९९७ : राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.
२००८ : अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२१)
२०१३ : भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
१९८७ : जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
२००५ : पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता जॅक किल्बी यांचे निधन (जन्म: ८ नोव्हेंबर १९२३)
१९७२ : हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचे निधन (जन्म: २ फेब्रुवारी १८९७)
१९३८ : अमेरिकन फ्लाइट नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १८९३)
News - todayspecialdays




Petrol Price




