महत्वाच्या बातम्या

 गोंडपिपरी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई : अवैध रेती वाहतुकीचा मोठा पर्दाफाश


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात गोंडपिपरी पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली, एक जेसीबी मशीन आणि रेती असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार १५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजता गोपनीय माहितीच्या आधारे मौजा तारडा ते कुलथा मार्गावरील संतोष देवाडे यांच्या शेतालगत अवैधरित्या रेतीचा साठा करून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये रेती भरून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

कारवाई दरम्यान विना क्रमांकाचा महिंद्रा सरपंच ४७५ डीआय ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती, तसेच विना क्रमांकाचा मॅसी फर्ग्युसन ९५०० ट्रॅक्टर व एमएच-३४ एल-९९२७ क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती भरलेली आढळून आली. याशिवाय रेती भरण्यासाठी वापरले जाणारे विना क्रमांकाचे जेसीबी ३डीएक्स प्लस मशीन देखील जप्त करण्यात आले.

या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, दोन ब्रास रेती आणि जेसीबी मशीन असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आशिक नरेश मडावी १९ वर्ष रा. व्यंकटपूर, रितेश देवेंद्र बटूटे ३० वर्ष रा. गोंडपिपरी, प्रज्वल विश्वनाथ कोहपरे १९ वर्ष रा. वढोली, हेमंत बंडू निखाडे २८ वर्ष रा. फुरडीहेटी, सचिन सुरेश चापले २२ वर्ष  रा. कवठी, ता. कवठाला, जि. आसिफाबाद, तेलंगणा आणि लोकश देवेंद्र बट्टे २० वर्ष रा. गोंडपिपरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात  पोलीस उपनिरीक्षक वसंत कोसमशिले, चालक सहाय्यक फौजदार पुनेश्वर कुळमेथे, पोलीस अंमलदार प्रशांत नैताम, तिरुपती गोडसेलवार, अतुल तोडासे आणि सुनील गव्हारे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos