महाराष्ट्रात मे महिन्यात शून्य सावलीचे दिवस : नागपूरसह विदर्भात तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : एप्रिलमध्ये लोकांना लाहीलाही करणारा सूर्य मे महिन्यातही जोरात तळपणार आहे. दक्षिणेकडून उत्तरायणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ३ मे ते ३१ मे या कालावधीत सूर्य महाराष्ट्राच्या डोक्यावरून जाईल. यामुळे उन्हाचे चटके अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याची भौगोलिक स्थिती १५ ते २२ उत्तर अक्षांशामध्ये असल्यामुळे सूर्यकिरणे सरळ पडण्याचा कालावधी सुमारे २८ दिवसांचा राहील. सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करेल, ज्यामुळे पूर्व-पश्चिम सुमारे एका अंशाच्या अंतरावर सूर्य नेमका डोक्यावर येईल. या ठिकाणी ‘शून्य सावली’ अनुभवता येईल.
महाराष्ट्रातील शून्य सावलीचे दिवस आणि ठिकाणे -
३ मे: सावंतवाडी, शिरोडा मांगेली, खुशगेवाडी, आंबोली
१८ मे: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, कोकण; तसेच विदर्भातील पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे: औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी
२० मे: चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल
२१ मे: मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना
२२ मे: मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे: खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड
२४ मे: धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर
२५ मे: जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा
२६ मे: नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे: नंदुरबार, शिरपूर, बुन्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
शून्य सावलीचा अनुभव दुपारी १२:०० ते १२:३५ या वेळेत घेता येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि गावांमध्ये काही सेकंदांचा फरक असू शकतो. भारतात शून्य सावलीचा अंतिम भूभाग मध्य प्रदेशातील भोपाळ जवळील २३.५० अंशावरून कर्कवृत्त आहे.
विदर्भातील नागपूरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये उन्हाळी उष्णता वाढणार असल्याने लोकांनी सूर्यप्रकाशापासून संरक्षण घेणे गरजेचे आहे.
News - Nagpur




Petrol Price




