एप्रिल ते जुन महिन्याचे शिधावाटप परिमान जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : माहे एप्रिल ते जुन महिन्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमितचे अंत्योदय अन्न योजनेंतर्गत तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत अन्नधान्याचे एकत्रित तीन महिन्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल ते जुन या तीन महिन्याकरीता शिधावाटप परिमान जाहिर करण्यात आले आहे.
नियमित प्राधान्य गट योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती ३किलो गहू व २ किलो तांदूळ, नियमित अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका २२ किलो गहू व १३ किलो तांदुळ मोफत दिले जाणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका १ किलो प्रमाणे किंवा साठा उपलब्धतेनुसार २० रुपये दराने वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




