करडीतील भाड्याच्या खोलीत लाईनमन महेश वरठे मृत आढळले : पोलिस चौकशी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / करडी/पालोरा : करडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत महेश वरठे (४५, मूळ रा. देवरी, जि. गोंदिया) यांचा मृतदेह रविवार सकाळी त्यांच्या घरात आढळला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आणि करडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. माहिती अशी आहे की, महेश वरठे करडी येथे भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. करडी पोलिस प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




