अर्जुनी मोरगावमध्ये बोलेरो वाहनाने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव येथे सोमवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, घरासमोर उभी असलेली बोलेरो गाडी मागे घेत असताना निष्काळजीपणा केल्यामुळे हा अपघात झाला.
घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी चिमुकल्याच्या पालकांनी अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार चित्रा सत्यनारायण सांगोळे (वय ४६, रा. वॉर्ड क्रमांक ५) यांनी सांगितले की, आरोपी सत्यनारायण रतीराम सांगोळे (वय ५०, रा. वॉर्ड क्रमांक ५) हे त्यांच्या ताब्यातील बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एमएच ३५ के ३२५७ ला घरासमोरील रस्त्यावर मागे घेत होते.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, आरोपीने वाहन मागे घेताना कोणतीही दक्षता न बाळगता, मागेपुढे न पाहता वाहन चालवले. याच दरम्यान, ईवांश राजेश ढवळे (वय २) गाडीच्या मागील बाजूने येत असताना वाहनाच्या पुढील डाव्या बाजूला जोरदार धडक बसली. धडकेमुळे ईवांश गंभीर जखमी झाला आणि रस्त्यावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) आणि २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू ठेवला आहे आणि पुढील तपास चालू आहे.
News - Gondia




Petrol Price




