शेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


 -मोबाईल टाॅवरच्या फसवणूकी प्रकरणी राज्यातील मोठी कारवाई
-१०० च्या वर नागरीकांना टाॅवरच्या नावाखाली गंडा
-आतापावेतो ४ ते ५ लाख रूपयांची एम.टी.एम. द्वारे केली आहे उचल
-बॅक अकाऊंट तुटपुंज्या रक्कमेवर भाड्याने घेवून त्यात मागवीत होते सर्व रक्कम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
मोबाईल टाॅवरच्या फसवणूकी प्रकरणी राज्यातील सर्वात मोठी कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन १०० च्या वर नागरीकांना शेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून बॅक अकाऊंट तुटपुंज्या रक्कमेवर भाड्याने घेवून त्याद्वारे आतापर्यंत ४ ते ५ लाख रूपयांची उचल करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक करण्यात आली आहे . 
गुन्हयाची हकीकत यप्रमाणे आहे की, फिर्यादी कैलास मारोती पिसे, वय २७  वर्ष, रा. डोगरगांव, तह. समूद्रपूर, जि. वर्धा यांनी देशोन्नती पेपरमध्ये ठडस् टावर कंपनीचे वोडाफोन ४ जी चे टाॅवर लावण्याकरीता अॅडवाॅन्स ९ लाख रूपये प्रती वर्ष किराया ८० हजार  रूपये कमवा सोबत नोकरी मिळवा. ही जाहीरात पाहून त्यांनी त्या जाहीरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक 9588398226, 8930118273 व 7056297679 वर फोन लावून माहीती घेतली व मिस रजनी नावाच्या व्यक्तीच्या बॅक आॅफ बडोदा चा खाता क्रमांक 57820100001373 पाठवून आरोपीने फिर्यादीच्या ई-मेल आयडीवर ‘‘इंडस बवर प्रायवेट लिमीटेड अॅग्रीमेट लेटर’’ व टाॅवरचे फोटो पाठविले व आरोपीने वेळोवेळी खोटे बोलून फिर्यादीला ९२ हजार ३५०  रूपये भरायला लावुन फिर्यादीची फसवणूक केली  अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. समुद्रपूर अप.क्र. ४९७/२०१८  कलम ४२० , ४६८ , ४७१  भादवी सहकलम ६६  (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० येथे गुन्हा नोंद करण्यात आला.  
 सदर प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्र व इतर राज्यात दाखल असल्याने सदर प्रकरणी सायबर पो.स्टे. तर्फे विशेष लक्ष देवून काम करण्यात आले. प्रकरणाची जूजबी तांत्रीक माहिती प्राप्त करून स्था.गु.शा.चे एक पथक जिल्हा करनाल, हरीयाणा येथे पाठविण्यात आले. सदर पथकाने आय.सी.आय.सी.आय. बॅंक, एच.डी.एफ.सी. बॅंक व एस.बी.आय येथील सी.सी.टी.व्ही. फूटेज प्राप्त केले तसेच परीसरातील काॅल सेंटरची माहिती काढण्यात आली. 
 पथकाने सतत १०  दिवस हरीयाणा येथे अथक परीश्रम करून आरोपी हे कुंजपूरा, जिल्हा करनाल येथून आपले काॅल सेंटरवर  फूसगड येथे जात आल्याचे तांत्रीक माहिती प्रमाणे पोलीस स्टेशन कुंजपूरा, जि. करनाल येथे येथील पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून १) ललीत रामकूमार रोहीला, वय २४  वर्षे, रा. घर नं. २०० , बनिया मोहल्ला, कुंजपूरा, ७५ , जि. करनाल, हरीयाणा, २) गुरनाम सिंह रमेश कूमार सींह, घर न. ४३ , बजीयपूर रोड, नलवी खूर्द, ८१, जि. करनाल, हरीयाणा या टेली काॅलर्स इसमांना ताब्यात घेतले व त्यांचेकडून विचारपूस दरम्यान प्राप्त माहितीप्रमाणे ए.टी.एम. मधून रक्कम काढणारा आरोपी ३) रवी धरमसींग आतरी, घर नं. १५४९ , मराठा काॅलनी, बसंती काॅलनी, कुंजपूरा ७५, जि. करनाल, हरीयाणा यास ताब्यात घेण्यात आले. त्यांचे जवळून गुन्हयात वापरलेले २ व इतर ३ असे ५ मोबाईल हॅन्डसेट, नागरीकांची नावे असलेल्या ३ डाय-या, नगदी रक्कम ८४०  रू व स्कूल बॅग असा जू.कि. २६,३४० रू चा माल जप्त करण्यात आला. 
 सदर कारवाई  पोलीस अधिक्षक   बसवराज तेली,  अपर पोलीस अधिक्षक  निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशांप्रमाणे पो.उप.नि. आशीष मोरखडे, ना.पो.शि. दिनेश बोथकर, अनूप कावळे, प्रदिप वाघ, राकेश आष्टनकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, चंद्रकांत जिवतोडे यांनी केली.  Print


News - Wardha | Posted : 2018-10-20


Related Photos