देशभक्त आणि देशद्रोहींमधील फरक ओळखला नाही : प्रियंका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ :
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, 'जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा निवडणून दिले. कारण जनतेला त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. मोदी वारंवार रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी बोलले, मात्र त्यांच्या हिताच्या कोणत्याच गोष्टी घडताना दिसत नाही.'
उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील शेतकरी महापंचायतीला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, '2017 पासून येथे उसाचे दर वाढलेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्‍यांची थकबाकी अद्याप दिली नाही, मात्र स्वत: साठी 16 हजार कोटींचे विमान खरेदी केले.' नवीन कृषी कायद्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, 'मोदी सरकारच्या या नवीन कायद्याचा फायदा फक्त उद्योगपतींनाच होणार आहे.'
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला जाऊ शकतात, मात्र दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि त्यांना आंदोलनजीवी-परजीवी म्हटले. मोदी देशभक्त आणि देशद्रोहींमधील फरक ओळखू शकले नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
  Print


News - World | Posted : 2021-02-16


Related Photos