के.टी.एस. रुग्णालयात काम करत असताना चौथ्या माळ्यावरून पडून प्रौढ ठार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील के.टी.एस. रुग्णालयात सोमवारी ६ एप्रिल सायंकाळी ४:२० वाजता काम करत असताना एका प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकाचे नाव विनोद रघुराव सोनवाने वय ५१, रा. काचेवाही असे आहे.
माहितीनुसार, विनोद सोनवाने हे रुग्णालयाच्या चौथ्या माळ्यावर काम करत असताना अचानक पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण तपासण्याखाली असून, पोलिस विभाग पुढील तपास करून अधिक माहिती देणार आहे.
News - Gondia




Petrol Price




