महत्वाच्या बातम्या

 नागपूरमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारातच नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीची केली धुलाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात पोलीस स्टेशनच्या आवारातच नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीची धुलाई केली. आरोपीचे नाव रघुवेंद्र उपाध्याय असून तो मौदा तालुक्यातील एका नामांकित खाजगी कंपनीचा सुपरवायझर आहे. आरोपीने तीन आठवड्यांपूर्वी कंपनीत काम करणाऱ्या एका विवाहित महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चॅटिंग केले होते. तसेच तिला व्हिडिओ कॉल ही केले होते. त्यानंतर पीडिता आणि तिच्या पतीने आरोपी विरोधात पोलीस तक्रार दिली होती.

पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतरही त्याला अटक केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी कालपासून पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केले होते. काल संध्याकाळी पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली आणि त्याचे कपडे फाडले.





  Print






News - Nagpur




Related Photos