महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


८ एप्रिल महत्वाच्या घटना

१८३८ : द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

१९११ : डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

१९२१ : आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

१९२९ : भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९५० : भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

१९९३ : मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

२००५ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

१८५७ : मंगल पांडे ह्यांना फाशी झाली

२०२४ : झिम्बाब्वे गोल्ड - झिम्बाब्वे देशाने झिम्बाब्वे गोल्ड हे नवीन चलन सुरु केले आहे, जे सोन्याच्या साठ्या आणि परकीय चलनांवर आधारित आहे.

८ एप्रिल जन्म

१९२४ : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

१९२८ : नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)

१९३८ : संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.

१९७९ : भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

१९५० : ओडिया चित्रपट अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजय मोहंती यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)

१८९२ : अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार मेरी पिकफोर्ड यांचा जन्म (मृत्यू : २९ मे १९७९)

१८९२ : ऑस्ट्रियन-अमेरिकन आर्किटेक्ट, लॉस एंजेलिस काउंटी हॉल ऑफ रेकॉर्डचे रचनाकर रिचर्ड न्यूट्रा रिचर्ड न्यूट्रा यांचा जन्म (मृत्यू : १६ एप्रिल १९७०)

१३६३ : मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचा जन्म (मृत्यू : १४ फेब्रुवारी १४०५)

८ एप्रिल मृत्यू

१८५७ : १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)

१८९४ : वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)

१९०६ : अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)

१९५३ : उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

१९७३ : स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)

१९७४ : मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)

१९९९ : कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.

२०१३ : ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)

२०१५ : भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

२१७ : रोमन सम्राट कॅराकल्ला यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १८८)

२००० : ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय बर्नी ग्रँट यांचे निधन (जन्म: १७ फेब्रुवारी १९४४)

१९७६ : भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचे निधन (जन्म: २० ऑगस्ट १८९६)

१९२२ : भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक पं. भास्करबुवा बखले यांचे निधन (जन्म: १७ ऑक्टोबर १८६९)

१८६१ : अमेरिकन व्यावसायिक, ओटिस लिफ्ट कंपनीचे संस्थापक अलीशा ओटिस यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १८११)

११४३ : बीजान्टिन सम्राट जॉन दुसरा कोंनेनोस यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १०८७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos