महत्वाच्या बातम्या

 अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र : इराणवर हल्ले, खाडी प्रदेशातील तणाव वाढला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तेहरान : खाडी देशांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला युद्ध संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे संकेत दिसत आहेत. माजी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती की, आताच तडजोड करा, अन्यथा तुमच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही.” या धमकीमुळे या दोन देशांमधील तणाव अधिक वाढला.

इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियन यांनी या धमकीला प्रत्युत्तर देत सांगितले की, “इराण अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही आमच्या पूर्ण क्षमता वापरणार आहोत आणि मागे हटणार नाही.

इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील सर्वात मोठा उंच बी-१ ब्रिज नष्ट केला आहे. हा हल्ला पाषाणयुगात पाठवण्याच्या धमकीनंतर काही तासांत करण्यात आला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अलबोर्ज परिसरातील या हल्ल्यात मोठे नुकसान झाले असून, कमीतकमी ८ जण ठार झाले आणि ९५ जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे खाडी प्रदेशातील तणाव शांत होण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

युद्धातील घटनाक्रम -
अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. तेहरानमधील १०० वर्ष जुना मेडिकल रिसर्च सेंटर टार्गेट करण्यात आला आहे. यानंतर इराणनेही कठोर चेतावणी दिली आहे. इराणने अमेरिकेला संभाव्य जमिनीवरील कारवाईबाबत इशारा दिला आहे. तसेच इराणने अबूधाबीतील गॅस फॅसिलिटीवर हल्ल्याचा प्रयत्न केला, जो हवेतच रोखला गेला, मात्र मलब्यामुळे थोडे नुकसान झाले.

याचबरोबर, इराणने कुवेतमधील खार पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला केला आहे. आपत्कालीन पथके घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदतकार्य करत आहेत. हा प्रकल्प समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवतो. जर इराणने खाडी देशांतील जलप्रकल्पांवर हल्ले सुरू ठेवले, तर या देशांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी मोठे आव्हान सोसावे लागेल.





  Print






News - World




Related Photos