महत्वाच्या बातम्या

 अमरावती, जळगाव आणि भंडाऱ्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांसाठी NABARD कडून ५४५ कोटींचे कर्ज मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना मोठा चालना मिळाली आहे. राज्य शासनाने NABARD कडून ५४५ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पुन्हा गती घेणार आहेत.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द (राष्ट्रीय प्रकल्प), अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी आणि जळगाव जिल्ह्यातील वाघूर या तीन प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांसाठी राज्य हिश्शा दीर्घ मुदतीच्या पाटबंधारे निधी अंतर्गत उपलब्ध होणार आहे.

मंजूर झालेल्या कर्जातून -
वाघूर प्रकल्प: ४३७.३२ कोटी
निम्न पेढी प्रकल्प: १०२.५२ कोटी
गोसेखुर्द प्रकल्प: ५.३० कोटी
या निधीमुळे प्रकल्पांची उर्वरित कामे, कालव्यांची जोडणी आणि इतर तांत्रिक अडथळे दूर होण्यास मदत होईल.

कर्जाची अटी व कालावधी -
हे कर्ज १५ वर्षांसाठी असून, सुरुवातीच्या ३ वर्षांना सवलतीचा कालावधी दिला आहे. त्यानंतर मूळ रकमेची परतफेड समान वार्षिक हप्त्यांमध्ये केली जाईल. व्याजदर NABARDच्या निधी उभारणी खर्चावर आधारित असेल. या निधीमुळे अमरावती, भंडारा आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्रकल्पांविषयी माहिती  -
गोसेखुर्द प्रकल्प
महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प
पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर उभारलेले
१९८३-८४ मध्ये सुरू, ३८ वर्षांनंतर २०२६ मध्ये पूर्ण क्षमतेने भरले
सुरुवातीला खर्च ३७२ कोटी, विलंबामुळे २५,००० कोटींपर्यंत वाढ

निम्न पेढी प्रकल्प -
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात स्थित
पेढी नदीवर बांधलेले
यंदा जूनमध्ये घळभरणी प्रस्तावित

वाघूर प्रकल्प -
जळगाव जिल्ह्यातील वाघूर नदीवर बांधलेले धरण
जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत





  Print






News - Rajy




Related Photos