गोंदियात वैनगंगा नदीतून अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई : ट्रॅक्टर पकडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम तेढवा येथील वैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी सोमवारी (३०) सकाळी १०:४५ वाजता पकडले.
आरोपी यश नरेंद्र पटले (२३, रा. सावरी) ट्रॅक्टर व निळ्या रंगाच्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती उपसा करून अवैधरीत्या वाहतूक करत असताना हवालदार गिरीश पांडे यांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ३ हजार रुपयांमूल्याची रेती जप्त केली, ज्यामुळे एकूण सहा लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त झाला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०५(ई), ४९, सह कलम ५०, ७७ तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास हवालदार बघेले करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




