महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केली कोषागार कार्यालयाच्या कामाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : आर्थिक वर्ष २०२५-२०२६ च्या अखेरच्या टप्प्यात आज ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा येथे भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी मुद्रांक सुरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणाची तसेच स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. कोषागारातील सुरक्षा कक्ष, नोंदवही व व्यवहारांची स्थिती याबाबतची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मंगला डोरले यांनी दिली. कार्यालयातील कामकाज शिस्तबद्ध व सुरळीत सुरू असल्याचे समाधान जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आर्थिक वर्षाचा शेवट ३१ मार्च रोजी होत असल्याने विविध विकासकामांची देयके, अनुदान वितरण तसेच नियमित आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार कार्यालयातील कामकाजाची गती व अचूकता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले.

सर्व देयके व आर्थिक व्यवहार नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होत असल्याची माहिती श्रीमती डोरले यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत श्रीमती डोरले यांनी केले. यावेळी अप्पर कोषागार अधिकारी मिलमिले अन्य कोषागार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .                    





  Print






News - Bhandara




Related Photos