गोंदिया : दुचाकीवरील अपघात, तरुण जागीच ठार; ट्रक चालक पसार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत देवरी-आमगाव मुख्य मार्गावरील ग्राम हरदोली येथे रविवारी २९ सकाळी सुमारे १०:४५ वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुर्दैवी अपघात झाला. यात ३२ वर्षीय मनीष उदाराम जनबंधू (रा. हरदोली, ता. देवरी) याचा मृत्यू झाला.
मनीष जनबंधू काही कामानिमित्त मित्रासोबत साखरीटोला गेला होता. घरी परतताना मित्राला वाटेत सोडून मनीष एकटाच घराकडे निघाला. या दरम्यान, देवरीकडून आमगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला पाहताच मनीषचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी ट्रकच्या मागील चाकाला जोरात धडकली.
धडक लागल्यामुळे मनीष खाली पडला आणि त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तो घटनास्थळीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सालेकसा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.
सालेकसा पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अपघातात जबाबदार असलेल्या ट्रक चालकाला लवकरात लवकर ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
News - Gondia




Petrol Price




