गडचिरोलीत एसीआयओ कार्यालयाची इमारत : सोनापूर येथे ५०० चौ. मी सरकारी जागा मंजूर

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : गडचिरोली तालुक्यातील मौजा सोनापूर येथील ५०० चौ. मी. शासकीय जमीन सहाय्यक मध्यवर्ती इंटेलिजिएन्स अधिकारी (एसीआयओ) कार्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर केली आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
मौजा सोनापूर येथील सर्वे क्रमांक १३५/१ मधील एकूण १६.६२ हेक्टर आर क्षेत्रापैकी ५०० चौ. मी जागा एसीआयओ कार्यालयाच्या बांधकामासाठी दिली जाणार आहे. चालू रेडी रेकनरनुसार येणारी कब्जेहक्काची किंमत आकारून ही जमीन मंजूर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त (नागपूर) आणि जिल्हाधिकारी (गडचिरोली) यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करावा लागेल, अन्य कोणत्याही कामासाठी वापर करावयाचा झाल्यास शासनाची पूर्वमान्यता आवश्यक राहील.
News - Rajy




Petrol Price




