महत्वाच्या बातम्या

 दुचाकीला भरधाव वाहनाची धडक : वडील ठार, मुलगी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत लोणाराटोला परिसरात गुरुवारी १९ सकाळी सुमारे ८:३० वाजता भरधाव वाहनामुळे दुचाकीवर झालेल्या अपघातात राजकुमार लिंबा वलथरे (वय ४८, रा. लोणारा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या २१ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.

तक्रारीनुसार, लोणारा येथील तरुणी व तिचे वडील राजकुमार वलथरे दुचाकीने लोणाराहून नवेझरीकडे जात होते. या वेळी एमएच ४०- बीजे ११८८ या क्रमांकाच्या दूधवाहक वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे त्यांना धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

दोघांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान वडील राजकुमार वलथरे यांचे निधन झाले. तरुणी सध्या गंभीर जखमी असून, तिचे उपचार सुरु आहेत. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून निघून गेला आणि कोणतीही मदत केली नाही.

या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी शुक्रवारी २० सायंकाळी ४:१४ वाजता भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बैस यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.





  Print






News - Gondia




Related Photos