महत्वाच्या बातम्या

 नागपूरमध्ये शेतीच्या फसवणुकीत ३७ लाखांचा घोटाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कामठी येथील शेती विकण्याच्या फसवणुकीत आरोपी पती-पत्नीने सराफा व्यावसायिकाला तब्बल ३७ लाखांमध्ये फसवले. या प्रकरणी तहसील पोलिसांनी दिलीप नारायण निनावे (४८) आणि दर्शना दिलीप निनावे (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज सुभाषराव निनावे (५०, रा. आशीर्वादनगर) यांच्या सराफा व्यवसायाशी आरोपी पती-पत्नी परिचित होते. त्यांचा व्यवसाय ठिकाण मनोज निनावे ज्वेलर्स, इतवारी, नाईक गल्ली, सराफा बाजार येथे आहे. आरोपी पती-पत्नी नेहमीच दुकानात ये-जाणे करत असल्यामुळे ओळख होती.

तपासानुसार, २२ सप्टेंबर २०२१ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान दिलीप व दर्शना यांनी मनोज निनावेंना सांगितले की त्यांच्या कामठी येथील शेतीवर कर्ज आहे आणि ती कमी किमतीत विकायची आहे. मनोज निनावे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ७ एप्रिल २०२५ रोजी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामाही केला.

या करारानुसार आरोपी पती-पत्नीने वेळोवेळी ३७ लाख रुपये घेतले. मात्र, शेतीची रजिस्ट्री न करता आरोपींनी मनोज निनावेंना फसवले. तक्रारीनंतर तहसील पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुशांत भगत यांनी दिलीप व दर्शना निनावेंविरुद्ध कलम ३१४, ३१६ (२), ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos