राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाचे दार खुले झाले आणि समाजात परिवर्तनाची नवी दिशा मिळाली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रदीप वडेट्टीवार, अजय कुकडकर, लंकेश सेलोटे, अंकुश झरली, सचिन साखरे, किरण मंगरे, अश्विनी नंदागिरवार सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




