संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा तालुक्यातील जे नागरिक दिव्यांग आहे आणि संजय गांधी योजनेंतर्गत लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र (युडीआयडी) संबंधित तलाठी किंवा तहसिल कार्यालयात २० मार्च पर्यंत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र आपल्या आधारकार्डशी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन संलग्न करुन घ्यावे. जेणेकरुन दिव्यांग लाभार्थी यांना दरमहा देण्यात येणारे २ हजार ५०० रुपयाचे अनुदान सुरळीत सुरु राहील, असे तहसिलदार वर्धा यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




