राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेऊन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद घोनमोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गावंडे मॅडम, झलके मॅडम, डॉ. संतोष डाखरे, डॉ. कैलास निखाडे, संजय खंडारकर, घोडे सर, शैलेश गावडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना गावंडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, असे सांगितले. झलके मॅडम यांनी क्रांतीज्योतींच्या प्रेरणेतून आज महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधल्याचे मत व्यक्त केले. डॉ. कैलास निखाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी क्रांतीज्योतींचे विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचे असून ते प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. संतोष डाखरे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन इरपा पुंगाटी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




