महत्वाच्या बातम्या

 उष्माघातापासून काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असतांना दिसून येत आहे. हिटवेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती आहे. एखाद्या प्रदेशात सलग ३ दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्शियसने जास्त असेल किंवा सलग २ दिवस तापमान ४५ डिग्री सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे असे संबोधले जाते.

एप्रील,मे, जुन महिन्यात तापमानात वाढ होवून उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे नागरीकांनी उष्माघाताबाबत सजग राहावे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी पराग सोमण यांनी केले आहे.

उष्माघात होवू नये यासाठी आतापासून नागरीकांनी जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्याकरीता जि्ल्हयातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक औषधी व साहित्य सामुग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये शितकक्ष स्थापन करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले यांनी दिली.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणाला होऊ शकतो -
 उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द व्यक्ती व लहान मुले, स्थूल व्यक्ती, अयोग्य कपडे घातलेले, पुरेशी झोप नसलेले, गरोदर महिला, काही विशिष्ट औषधी घेत असलेले व्यक्ती, निराश्रित, घरदार नसलेले गरीब व्यक्ती या अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटे संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे.

उष्णताविकाराची प्रकार व लक्षणे -
सनबर्न - त्वचा लालसर होणे, सुज येणे, वेदना, तिव्र स्वरुपाचा ताप व डोकेदुखी

हिट कॅम्पस- हातापायात गोळे येणे, पोटाच्या स्नायुत मुरडा येणे व खुप घाम जाणे

हिटएक्साशन -खूप घाम येणे, थकवा येणे, त्वचा थंडगार हाणे, नाडीचे ठोके मंद होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे, हिटस्ट्रोक-ताप १०६ (डिग्री फॅ) त्वचा गरम व कोरडी होणे, नाडीचे ठोके वेगात व जोरात होणे व घाम न येणे, अर्धवट शुध्वीत असणे.

उष्माघात विकारापासून बचाव करणेकरीता काय करावे -

पुरेसे पाणी प्यावे लस्सी, निंबुपाणी, ताक इ. चा पिण्याकरीता उपयोग करावा प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे, फिक्कट रंगाचे, सैलसर कपडे वापरा उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा, उन्हात जातांना टोपी/हँटखली ओलसर कपडा ठेवावा, पाळीव प्राण्यांना सावलीत, थड ठिकाणी ठेवावे, ओलसर कपडा, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत घाम येत असेल तर त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रात डॉक्टराचा सल्ला घ्यावा.

काय करू नये -
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, कष्टाची कामे उन्हात करु नये, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नये. गडद रंगाचे फिट कपडे वापरु नये. उन्हाच्या वेळेस स्वंयपाक करणे टाळावे, स्वंयपाक घर हवेशीर ठेवावे. मद्य, चहा, कॉफी, सॉप्टड्रिंक्स आहारात घेवू नये. खूप प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खावू नये. बाहेरचे उघडयाव्ररचे व तळलेले पदार्थ खावू नये, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos