केंद्रीय अहवाल : महाराष्ट्रातील नद्या देशातील सर्वाधिक प्रदूषित : ५४ प्रमुख नद्यांवर गंभीर परिणाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार, देशभरातील ६२३ प्रमुख व मोठ्या नद्यांच्या अभ्यासात २७१ नद्यांमध्ये २९६ प्रदूषित पट्टे आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ५४ तर विदर्भातील सात प्रमुख नद्यांचा समावेश आहे.
या नद्यांचे पाणी शहरांसह छोट्या-मोठ्या गावांना पिण्यासाठी पुरविले जाते, मात्र औद्योगिक व जैविक रसायनांच्या मिश्रणामुळे जलशुद्धीकरण पूर्णपणे प्रभावी होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्यावर तसेच नद्यांमधील जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत.
पाणी प्रदूषणाचे मोजमाप -
पाणी प्रदूषित आहे की नाही हे ठरवण्यासाठी बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) आणि सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) चे प्रमाण मोजले जाते.
बीओडी ≤ ३ एमजी/लिटर : पाणी स्वच्छ
बीओडी ३ – १० एमजी/लिटर : मध्यम प्रदूषित
बीओडी> १० एमजी/लिटर : अतिप्रदूषित
सीओडी १० – २० एमजी/लिटर : पाणी स्वच्छ
सीओडी> २० एमजी/लिटर : प्रदूषित
प्रदूषणाची तीव्रता -
भारतातील ४६–५० नद्यांचे पाणी औद्योगिक कचरा आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्राधान्य-१ व प्राधान्य-२ श्रेणीतील नद्या सर्वाधिक प्रदूषित मानल्या जातात, ज्यात ३७ पट्टयांचा समावेश आहे. प्राधान्य-३ व प्राधान्य-४ श्रेणीतील नद्या मध्यम प्रदूषित मानल्या जातात.
महाराष्ट्रातील स्थिती -
केंद्रीय अहवालानुसार महाराष्ट्रात ५४ नद्या अति व मध्यम प्रदूषित आहेत. दुसऱ्या क्रमांकावर केरळ (३१ नद्या), तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश व मणिपूर (प्रत्येक १८), चौथ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश (प्रत्येक १७), पाचव्या क्रमांकावर ओडिशा (१६) या राज्यांची नद्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख प्रदूषित नद्या -
प्राधान्य-१ (अतिप्रदूषित) : मिठी (मुंबई), काळू (ठाणे), कुंडलिका (रायगड), साबरमती, इंद्रायणी
प्राधान्य-२ : मुळा, मुठा, पवना, भीमा, मुळा-मुठा, इंद्रायणी, वैनगंगा, वर्धा
प्राधान्य-३ : गोदावरी, कृष्णा, तापी, पूर्णा, कन्हान, कोलार, वेणा, उर्मोडी, घोड, वाघूर
प्राधान्य-३ व ४ : कोयना, चंद्रभागा, दारणा, बिंदुसरा, सीना, पेल्हार, गिरणा, हिवरा, तिठूर, बोरी, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, पंचगंगा, अंबा, भातसा, पांझरा, सूर्या, तानसा, मांजरा, रंगवली, गोमाई, कान, नागनदी, मोरना
अहवालानुसार, या नद्यांमधील प्रदूषण मानवी आरोग्यासाठी तसेच नद्यांमधील जैवविविधतेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.
News - Nagpur




Petrol Price




