गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीची मैदानी चाचणी संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ७१७ पोलीस शिपाई व २७ चालक पोलीस शिपाई पदाकरीता एकूण २०,७९७ उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी एकुण ५५१ पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अंत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस भरती मैदानी चाचणी सुरळीतपणे संपन्न.
गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२६) च्या ७१७ पदांकरीता तसेच चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२६) च्या २७ पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी ११ फेब्रुवारी २०२६ सुरु होऊन आज ०७ मार्च २०२६ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदान येथे सुरळीतपणे संपन्न झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ७१७ पोलीस शिपाई पदाकरिता एकुण २३,७९१ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते असून त्यापैकी १३,६७४ पुरुष उमेदवार व ६,५७३ महिला उमेदवार हजर झाले होते. त्यापैकी १२,६३१ पुरुष व ५,७४३ महिला उमेदवार असे एकुण १८,३७४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. तसेच चालक पोलीस शिपाईच्या २७ पदाकरिता ३,२९६ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी २,३४७ पुरुष व ४५२ महिला उमेदवार शारिरीक चाचणी करीता हजर आले होते व त्यापैकी २,०९९ पुरुष व ३२४ महिला उमेदवार असे एकुण २,४२३ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.
यासोबतच उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष सुरु असून १० मार्च २०२६ रोजी पर्यंत एकुण ५७५ उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
सदर भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी झालेल्या उमेदवारांची गुणांची यादी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लगेचच दुसया दिवशी प्रकाशीत केली जात होती. आतापर्यंत मैदाणी चाचणी झालेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची यादी व लेखीपरिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी तसेच लेखी परिक्षेचा दिनांक पुढील आठवड्यात गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबविण्यात आली असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच उमेदवारांची १६०० मी. धावणे (पुरुष), ८०० मी. धावणे (महिला), १०० मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात आला आहे.
तसेच उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातच रुग्णालयाची सोय करण्यात आली होती व इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले.
या मैदानी चाचणी बंदोबस्ताकरीता ६९ पोलीस अधिकारी व ४८२ अंमलदार असे एकुण ५५१ मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. सर्व मैदानी चाचणी यशस्वीरित्या पार पडल्याच्या अनुषंगाने बंदोबस्तात तैनात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ यांच्याकरीता आज रोजी शहीद पांडू आलाम सभागृह येथे पोलीस दलाच्या वतीने स्नेहभोजन (बडाखाना) चे आयोजन करण्यात आले होते.
सदर भरती प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणी करीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकूल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर मैदानी चाचणीच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक गडचिरोली, नीलोत्पल यांचे कडून कौतुक करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




