रेल्वेची धडक लागून महिलेचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : रेल्वे मार्ग ओलांडताना धावत्या रेल्वेची धडक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी ५ सकाळी बरबसपुरा रेल्वे गेटजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत महिलेचे नाव संगीता अनमोल पटले (वय ३५, रा. बरबसपुरा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता पटले या गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास काचेवानी येथे वाडीत कामासाठी जात होत्या. दरम्यान, बरबसपुरा रेल्वे गेटजवळ रेल्वे पटरी ओलांडत असताना तुमसरकडून गोंदियाकडे येणाऱ्या गोंडवाना एक्स्प्रेसने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात संगीता पटले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला.
या प्रकरणी संतोष आशाराम पटले (रा. बरबसपुरा) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बैस करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




