महत्वाच्या बातम्या

 अमृत लक्षित गटातील उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेच्यावतीने केंद्र शासनाच्या ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सी-डॅक या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अमृत लक्षित गटातील उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे. योजनेंतर्गत जानेवारी व फेब्रुवारी २०२६ च्या बॅचमध्ये सी-डॅकमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

प्रत्येक प्रशिक्षणासाठी कमाल २० लाभार्थ्यांची मर्यांदा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अमृत लक्षित गटात ब्राम्हण, कायस्थ, कोमटी वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराती, ठाकूर, जात, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा आणि कानबी जातीतील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

अधिक माहितीसाठी अमृतच्या प्रशासकीय भवन, वर्धा येथील जिल्हा कार्यालयातील ९११२२२७६३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos