आरमोरी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील नागरीकांना शासकीय योजनाचा लाभ घरपोच मिळावा, या हेतुन छत्रपती शिवाजी महाराज महराजस्व समाधान शिबीर हे अभियान तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तहसिल कार्यालय आरमोरी यांच्या वतीने तालुक्यातील चार मंडळामध्ये शिबीरे भरविण्यांत येणार आहेत. वैरागड येथे ७ मार्च, देऊळगांव १४ मार्च, पिसेवडधा १० एप्रिल व आरमोरी ८ मे, २०२६ रोजी शिबीराचे आयोजन करण्यांत येणार आहे.
शिबीरामध्ये महसुल विभागासोबतच पंचायत समीती, भुमी अभिलेख, विज वितरण, बँक, उप जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी विभाग, महिला व बालविकास, वन विभाग उमेद अभियान यांचे स्टॉल उपलब्ध राहणार आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभारी तहसिलदार हरीदास दोनाडकर यांचे अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची तसेच मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी व सहा. कृषी अधिकारी यांची विशेष बैठक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली.
बैठकीत शिबीराच्या नियोजनाबाबत, स्टॉल व्यवस्थापनाबाबत तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यांत आली. नागरीकांना शिबीराची माहीती व्हावी, यासाठी गावोगावी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्याची सुचना उपस्थितांना देण्यांत आली. तसेच नायब तहसिलदार यांनी सुद्धा गावोगावी भेटी देवून नागरीकांना याचा लाभ घेण्याबाबत आव्हान करण्यांत आले. यामुळे अधिकाअधिक नागरीकांना योजनांचा लाभ घेता येईल, असा विश्वास तहसिलदार हरीदास दोनाडकर यांनी व्यक्त केला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




